Share

बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज सुरु करा; नितेश राणेंचे प्रशासनाला पत्र

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. मात्र, आता काही प्रमाण स्थिती आटोक्यात आपल्याने हळू-हळू सर्वकाही पूर्वी प्रमाणे सुरळीत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागात लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे याकरिता भाजप आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

नितेश यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की,’ कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्ष सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्पटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय आणि पारंपारिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.’

दरम्यान, ‘या कार्यक्रमांमध्ये बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल. असा मी विश्वास देतो. तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शर्यतीस अधीन राहून सुरु करण्यात परवानगी द्यावी’ असेही या पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!