🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ‘सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु व्हाव्यात यासाठी रेल्वे आंदोलन करावे लागले तर आंदोलन करु’, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘हातावर पोट भरणारा कर्मचारी वर्ग कर्जत-कसारा ठाण्यापर्यंत राहतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊ, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, मोदी सरकारच्या विस्तार दोन दिवसांपूर्वी पार पडला. भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपल्या पदाचे सूत्र स्विकारताच दानवे यांनी लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात कोरोना रुग्णांची वाढ कायम; आजही कोरोनामुक्तांचा आकडा कमी
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘शिवसेना खा.प्रतापराव जाधव, आ.गायकवाड यांची ईडीमार्फत चौकशी करा’, जोगेंद्र कवाडेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

