🕒 1 min read
मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2016-17 मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता, आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे.
माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली होती. माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचंह नाना पटोले यांनी म्हटलं होते.
याच पार्श्वभूमीवर बोलताना आज भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र डागले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘ परवा विधानसभेत एका पक्षाच्या बोलघेवड्या अध्यक्षाने फोन टॅपिंगचा मुद्दा मांडला. तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोन टॅप करत असल्याचं काल ते लोणावळ्यात बोलल्याचं समजलं. फोन टॅपिंग करताना ‘अमजद खान’ हा त्यांचा कोडवर्ड ठेवला होता. ते जर अमजद खान असतील तर ‘कितने आदमी थे?’, हा आमचा सवाल आहे.
तुमचा फोन टॅप करायला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह ‘कितने आदमी थे?’ हे आम्ही विचारत आहोत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ टगेगिरीच्या विषयावर लक्ष घातलं जात आहे. त्यातून राज्याचं नुकसान होत आहे. त्यामुळेच आगामी काळात आम्ही सरकारविरोधी एल्गार अधिक तीव्र करणार आहोत,’ असे टीकास्त्र त्यांनी यावेळी डागले आहे.
दरम्यान आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलीस महासंचालक, आयुक्त गुप्तवार्ता विभाग आणि अतिरिक्त आयुक्त विशेष शाखा सदस्य असतील. या समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उत्साही पर्यटकांना आवर घाला, अन्यथा..’ केंद्राच्या राज्यांना सुचना
- कामकाज हाती घेताच ज्योतिरादित्य शिंदेंचा मोठा निर्णय; देशांतर्गत नव्या ८ हवाईमार्गांची सुरुवात !
- उत्तर प्रदेशप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणे आवश्यक – देवेंद्र फडणवीस
- होशियार… अमित शहा येत आहेत दार खिडक्या बंद ठेवा !
- प्रवाशांसाठी सुखद वार्ता! औरंगाबाद-दिल्ली विमानाचे आता दररोज उड्डाण होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

