Share

‘शिवसेना खा.प्रतापराव जाधव, आ.गायकवाड यांची ईडीमार्फत चौकशी करा’, जोगेंद्र कवाडेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : तुम्ही कायदे मंडळात आहात तर या कायदे मंडळाचा सन्मान करा. मात्र कायद्याचाच सन्मान न करता दहा हजारांची फौज आणण्याचे व दरोड्याचे गुन्हे दाखल करण्याचे सल्ले देता. लोकप्रतिनिधींचे काम दोन्ही पक्षांना समजाऊन सांगण्याचे व सलोखा टिकवण्याचे आहे. मात्र खोट्या तक्रारी केल्यास अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत बुलडाण्यात माजी आ. विजयराज शिंदे यांच्यावर तुम्हीच खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का करायला लावला? असा सवाल रिपाइंचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आ. संजय गायकवाड यांना केला.

चितोडा खामगाव येथे भेट देण्यासाठी जोगेंद्र कवाडे आज आले होते. या निमित्त बुलडाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेची सगळी सूत्रे जिथून हलतात त्या मातोश्री निवासस्थानास व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांची हकालपट्टी करा, तसेच केंद्र सरकारने तय्यार केलेल्या ऍट्रॉसिटी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी देखील प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

‘खा. प्रतापराव जाधव यांची ईडी ची चौकशी केली पाहिजे. ते एवढी संपत्ती कशी काय आली म्हणत असतील तर आमचीही संपत्तीची चौकशी करा, असे आवाहनच जोगेंद्र कवाडे यांनी केले. ॲक्ट्रासिटी लावण्यासाठी आम्ही लढा देऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटु व आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असतांनाही आमच्या सारख्यांवर अन्याय होत असल्याबद्दल रोष व्यक्त करणार असल्याचेही कवाडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!