🕒 1 min read
पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
आज (दि. ११ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल २८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८१ हजार ८३४ इतकी झाली आहे. शहरातील २२८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७० हजार ०९७ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या ३ हजार ०८५ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २२७ रुग्ण गंभीर तर ४९१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्याच्या महापौरांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने केला सन्मान !
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘ते जर अमजद खान असतील तर…’ ; आशिष शेलारांचा पटोलेंना टोला
- काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘शिवसेना खा.प्रतापराव जाधव, आ.गायकवाड यांची ईडीमार्फत चौकशी करा’, जोगेंद्र कवाडेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

