Share

‘एसटी कामगारांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं’

Published On: 

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळ कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखा आहे. पगार मिळतो हे त्यावर समाधानी राहील’, असा त्यांचा सल्ला आहे. औरंगाबादमध्ये त्यांची प्रकट मुलाखत झाली आहे. या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली आहे.

दरम्यान, पगार मिळतोय, चुल्ही पेटत आहेत, घरं राहिली आहेत, यावर आपण काही काळ समाधानी राहिलं पाहिजे. हळू हळू मार्ग निघतील ही आमची भूमिका आहे. बाळासाहेबांनी पण नेमकं हेच असतं. एसटी कामगारांना पगार देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला आता पर्यंत 2 हजार कोटी रुपये दिले आहेत. ही लहान गोष्ट नाही. यापुढेही देणार पण काही मागण्या या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. आणि त्याच्यासाठी तुम्ही रक्त आटवलं. हे भिंतीवर डोक आपटून घेण्यासारखं असतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!