मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम कमी झाल्यामुळे लसीकरण केंद्राकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पण अद्यापही कोरोनाचे संकट कमी झाले नसून लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, शासकीय सुविधा मिळवण्यासाठी लस घेणे बंधनकारक नाही, पण देश हितासाठी लस घेणे गरजेचं आहे, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
शासकीय तसेच इतर सुविधांसाठी लसीकरण बंधनकारक सक्तीचे नाही. मात्र देश हितासाठी लस घेणे गरजेचे आहे. सक्ती करणे कायद्याला धरून होणार नाही. जे कायद्यात बसत नाही ते अनिवार्य करावे का हा प्रश्न आहे. कायद्यात बसून मार्ग काढण्यासाठी अॅडोव्होकेट जनरल तसंच चीफ जस्टीस यांचा सल्ला घेणार आहोत, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या आहे असे समजून नागरिक लस घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मॉल, पेट्रोल पंपावर लस घेतल्यावरच प्रवेश मिळेल असे निर्णय काही ठिकाणी घेण्यात आले होते. या निर्णयावर स्पष्टीकरण देत राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया
- पायातली ‘कोल्हापुरी’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला
- संजय राऊतांचा ‘आक्रोश मोर्चा’ परवानगीविनाच; पोलिसांकडून कारवाईचे संकेत
- ‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’
- ‘दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो’ विकी कौशलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

