Share

औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांना आता ‘मनसे’ची साथ; राज ठाकरेंच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परंतु राज्य शासन याबाबत उदासीन असून अजूनपर्यंत कुठल्याही मागण्या मान्य झालेल्या नाही. एसटी कामगारांच्या मागण्यांना मनसेचा पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांचे पत्र मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, मनसे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी मनसेचे परिवहन कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश दिक्षीत आदींची उपस्थिती होती. एसटी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आज राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे एसटीला घरघर लागली आहे. अगदी सर्वसामान्य घटकांना सोयीसुविधा आणि सवलती एसटी महामंडळ जसे अपंग सवलत, विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत अशा ४३ प्रकारच्या सवलती एसटी महामंडळ जनसामान्यांना पुरवते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आत्तापर्यंत २०२१ मध्ये अत्यंत अपुरे वेतनतेही अनियमित. यामुळे ३३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. दहा वर्षापासून एसटी कामगारांची एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी आहे. परंतु राज्य शासन याबाबत उदासीन आहे शेजारील राज्याप्रमाणे कर्नाटक तेलगाना, गुजराठ आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात या राज्याच्य धर्तीवर एसटीचे विलिनीकरण राज्य शासनात करण्यासाठी सर्व कामगारांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!