Share

‘जेव्हा फिटनेसप्रेमी एकत्र येतात तेव्हा..’ प्राजक्ता,सोनालीच्या व्हिडिओवर चर्चा

Published On: 

मुंबई : आजच्या धावपळीच्या दुनियेत आरोग्य सांभाळणं खूप गरजेचे आहे. त्यात सेलिब्रिटींना तर फिटनेसकडे अधिक लक्ष द्यावा लागतो. तसेच मराठी इंडस्ट्रीमधील जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसबद्दल सजग झाले आहेत. मात्र फिटनेसचे नाव काढले की प्राजक्ता माळी आणि सोनाली खरे ही नावे चटकन समोर येतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघीही व्यायाम करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर प्राजक्ता आणि सोनाली एका जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाचा टि शर्ट आणि करड्या रंगाची ट्रॅक पँट घातली असून सोनालीने पिवळ्या रंगाचा टि शर्ट आणि करड्या रंगाची पँट घातली आहे. या व्हिडिओमध्ये त्या अष्टांग योगामधील एक योग करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CWALUK4INjJ/?utm_medium=copy_link

नुकतीच प्राजक्ता सोनाली खरेच यूट्यूब चॅनेल असलेल्या ‘वॉव विथ सोनाली’ वरील ‘खरे बोल’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात पोहचली होती. यावेळी प्रजक्ताने तिच्या फिटनेसबद्दल तसेच तिच्या फिटनेसच्या आयुष्यातील स्थानबद्दल भरभरून गप्पा मारल्या. ती अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती करत असलेला अष्टांगयोग खूपच चर्चेत असतो. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची  हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली आणि घराघरात पोहचली. सोनाली खरेबद्दल सांगायचे झाल्यास तिचा फिटनेस तिला किती प्रिय आहे हे सर्वांना माहीतच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!