Share

औरंगाबादेत शिवसेना रस्त्यावर उतरून महागाईचा करणार निषेध

Published On: 

औरंगाबाद : सातत्याने वाढत्या महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्य जनतेमध्ये संताप निर्माण झाला असून मोदी सरकारने २०१४ साली महागाई विषयी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तुशिवाय बँकींग, बांधकाम वस्तु, शेतीसाठीची रासायनिक खते बि-बीयाणे सर्वच बाबींच्या दरवाढीने त्रस्त जनतेचा संताप शिवसेना रस्त्यावर उतरून व्यक्त करणार आहे. शनिवारी (दि. १३) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्शवभूमीवर शहरातही मोर्चा काढला जाणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.

या मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, नंदकुमार घोडेले यांचीही प्रमुख उपस्थिती राहील. मोर्चाची क्रांती चौक येथुन सुरुवात होऊन गुलमंडी येथे सभेने समारोप होईल. त्याआधी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प, पंचीयत समिती गट गणनिहाय महागाई विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे.

गुरुवारी महिला आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी एक अभिनव आंदोलन करण्यात येईल. त्या अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनाला निवेदने देऊन पेट्रोलपंप, गॅस एजन्सीला संरक्षणाची मागणी करण्यात येईल. या महागाई विरोधी एल्गारामध्ये सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना इतर अंगीकृत संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजु राठोड यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!