मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कवडीमोल भावाने मलिकांनी जागा खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावर मलिक यांनी स्पष्टीकरण देताना ‘मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून कुठलीही संपत्ती घेतली नाही किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचं असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर हे सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का? असा सवाल केलाय.
मलिकांच्या या खुलाशावर आक्षेप घेत सनातन संस्थेने दावा फेटाळला आहे. तसेच मलिक यांनी खोटी माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.
सनातन संस्थेने म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि वकील अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी. मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे वकील श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे असं सनातन संस्थेने सांगितले.
दरम्यान, असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही सनातन संस्थेने नवाब मलिकांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ..तर मग सनातन आणि दाऊद यांचा संबंध आहे असं समजायचं का?, मलिकांचा फडणवीसांना सवाल
- ‘स्वतःवरील आरोप झाकण्यासाठीच फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण बाहेर काढले’
- मुख्यमंत्री ठाकरेंनी मलिकांविरोधात एफआयआर दाखल करावा; आशिष शेलारांची मागणी
- अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
- ‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

