मुंबई : महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना १७ महिन्यांचे पगार मिळालेले नाहीत ते आधी द्या. कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये बोनस दिला आहे. घरातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पाच हजार रुपये देतो. २९ आत्महत्या झाल्या आहेत. कोविडमध्ये एसटी नसती तर महाराष्ट्राला अर्धांगवायू झाला असता. अशा एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा नियम असताना पाच लाख द्यायचे. आतापर्यंत झालेल्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी भाजप ताकदीने त्यांच्या मागे उभी आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आलेली नाही. दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला तरीही सरकार कोणत्याही मागण्या मान्य करत नाही. शरद पवार केव्हापासून सरकारच्या वतीने घोषणा करायला लागले? सरकारच्यावतीने घोषणा उद्धव ठाकरेंनी करायला हव्यात. का मुख्यमंत्री बदलेले आहेत?, असा खोचक सवालही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा, असे शरद पवार बारामतीमधील पत्रकार परिषदेत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- भाजपला देशातून हटवा अन् पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा- नाना पटोले
- पुतळ्या उभारण्याआधीच सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवाद
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
- ‘शिवसेनेनं एक निवडणूक काय जिंकली, लगेच पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय


