Share

‘युसूफ भाई, आपल्या छोट्या बहिणीला सोडून का गेलात?’ ; लता दीदींनी केली भावूक पोस्ट

Published On: 

मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांचे वय ९८ होते. गेल्या काही दिवसापासुन दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे उपचारासाठी त्यांना २९ जुन रोजी मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण बॉलीवुड विश्वात दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या निधनामुळे गानकोकीळा लता मंगेशकर यांनी आपल्या भावाला हरपले आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर ट्रॅजेडी किंग म्हणजेच दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या. आज भावाच्या निधनाचे वृत्त समजताच लता मंगेशकर यांनी काही जुने फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले. त्यांनी एकानंतर एक बरेच ट्विट केले आहे.

‘युसूफ भाई, आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून गेले. युसूफ भाई, का गेलात, एका युगाचा अंत झाला. मला काहीच सूचत नाही. मी खूप दुःखी आहे. निःशब्द आहे. बऱ्याच गोष्टी आठवणी देऊन जातात. युसूफ भाई, मागील कित्येक वर्षांपासून आजारी होते. कोणाला ओळखत नव्हते अशा काळात सायरा वहिनीने सर्व सोडून दिवस रात्र त्यांची सेवा केली. त्यांच्यासाठी दुसरे जीवन नव्हते. अशा स्त्रीला मी अभिवादन करते आणि युसूफ भाईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करते.’ अशा आशयाचे भावूक पोस्ट ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी केल्या आहेत.

नुकतेच दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कुटुंबीयानी जुहू येथील कब्रस्थानात सायंकाळी पाच वाजता दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!