मुंबई : काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत असून या कामात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांना हाताशी धरले आहे असा गंभीर आरोप केला होता. तसेच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह देखील दिला. ज्यामध्ये सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा फडणवीसांनी केला. दरम्यान, फडणवीसांनी केलेले आरोप आता प्रवीण चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच या स्टिंग ऑपरेशनमागे जळगाव कनेक्शन असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रवीण चव्हाण म्हणाले की,‘या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे.’ तसेच मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होते, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्याकरीता माझ्याकडे येत होता. तसेच त्याला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांचीही त्याला साथ आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी’, असे चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महावितरणकडून शिबिरांचे आयोजन, शेतकऱ्यांची वाढीव वीजबिले दुरुस्त होणार!
- ‘मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो’ – राज्यमंत्री बच्चू कडू
- Women’s WC 2022: हरमनप्रीत कौरचे धमाकेदार शतक; विश्वचषकात भारताच्या पहिल्यांदाच ३०० धावा
- Women’s WC 2022: भारताची स्टार स्मृती मंधानाचे शानदार शतक!
- “अब अनिल परब का नंबर भी आयेगा”, किरीट सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

