Share

Women’s WC 2022: हरमनप्रीत कौरचे धमाकेदार शतक; विश्वचषकात भारताच्या पहिल्यांदाच ३०० धावा

Published On: 

मुंबई: भारताची फलंदाज हरमनप्रीत कौरने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या महिला विश्वचषक सामन्यात चौथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक झळकावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १३.५ षटकांत भारताची ७८-३ अशी अवस्था असताना क्रीजवर आलेल्या हरमनप्रीतने सलामीवीर स्मृती मंधानासह (smriti mandhana) १५४ धावांची भागीदारी रचली, ज्यात स्मृतीने केवळ ११९ चेंडूंत १२३ धावांची धडाकेबाज खेळी केली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या शतकासह, हरमनप्रीत कौरकडे (harmanpreet kaur) आता महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक शतके (३) आहेत. या स्टायलिश फलंदाजाने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १०७ धावांवर नाबाद असताना टूर्नामेंटमध्ये तिचे पहिले शतक झळकावले होते. २०१७ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिने केवळ ११५ चेंडूंत नाबाद १७१ धावा केल्या आणि भारताला ३६ धावांनी विजय मिळवून दिला. म्हणून तिचे दुसरे शतक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वर्चस्व गाजवणारी खेळी म्हणून ओळखली जाते.

हरमनप्रीतने स्मृती मंधाना आणि मिताली राज (दोघेही दोन शतकांसह) यांना मागे टाकून पराक्रम गाठला आहे. शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या खेळीत हरमनप्रीतने १०७ चेंडूंत १०९ धावा करताना १० चौकार आणि दोन षटकार ठोकले. डावाच्या ४९व्या षटकात आलिया अॅलेनीविरुद्ध स्कूप शॉट मारताना ती बाद झाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!