परभणी : रब्बी हंगामातील पिके चांगली जोमात आहेत. सुरळीत चालू असताना शेतकऱ्यांच्या माथ्यावर वाढीव वीज बिल फेकली जात आहेत. वीज बिलाचा आकडा वाढतच असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे.
महावितरणकडून शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वीजबिल दुरुस्ती शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या शिबिरात शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडता येणार असून शेतकऱ्यांच्या समस्यां सोडविल्या जाणार आहेत. तसेच मागील वीजबिलांची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी –
वापरापेक्षा अधिक वीजबिल येत आहे, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच ३ महिन्याला कृषीपंपाचे बिल देणे बंधनकारक असताना, ६ महिन्यातून एकदा तेही वाढीव बिल दिले जात अशीही तक्रार शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या शिबिरा अंतर्गत मीटर वाचन, थकबाकी या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. यानंतर वीज बिल दुरुस्ती केल्यानंतर शेतकऱ्यांना कळविली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –


