Share

स्वबळाचा नारा दिल्याने काँग्रेसमधील बैठकांना वेग, औरंगाबादला नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा नारा दिला होता. मात्र, दिल्लीत राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस चांगलीच कामाला लागली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीचा विचार करता काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यावर नवी जबाबदारी येण्याची चर्चा सुरू झालीय.

काँग्रेसच्या बैठकीत केवळ जिल्ह्यातील प्रश्न आणि विकास कामांवर चर्चा झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लवकरात लवकर महामंडळे आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या पूर्ण करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला यातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपकडे आता केंद्रीय राज्यमंत्री पद तर शिवसेनेकडे राज्यातील दोन मंत्री पदे आहेत. अशा परिस्थितीत प्रचारात आघाडी घेण्यासाठी औरंगाबाद काँग्रेसमधील एखाद्या नेत्याला महत्त्वाचे महामंडळ दिले जावू शकते. त्या दृष्ट्रीने अमित देशमुख यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीकडे पाहिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!