Share

‘अजित पवारांमुळे ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी निधी मंजूर’, धनंजय मुंडेंची माहिती

Published On: 

बीड : राज्यात कोरोनाची दुसऱ्या लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण काहीसे चिंताजनक दिसून येत आहे. या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत.

बीड जिल्हा कोविड-19 आणि खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. ‘कोविड संकटाबरोबरच जिल्ह्यातील ऊसतोड मजूर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासनाने संत भगवानबाबा वसतीगृह योजनेला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर झाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गाळप होणाऱ्या उसा मागे प्रतिटन 10 रुपये निधी आकारला जाऊन तो महामंडळास दिला जाईल’ असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

पीक कर्ज वाटपसाठी १५ जुलै ही अंतिम मुदत
महाबीजकडून उपलब्ध होणारे बियाणे मर्यादित आहे. परंतु राज्य शासन इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी उपाय करीत आहे. खतांचे पुरेशी उपलब्धता करण्यात आली असून पिक कर्ज वाटपासाठी बँकांना 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!