🕒 1 min read
मुंबई : रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल २०२२ची सुरुवात चांगली झाली नाही. जडेजाला आतापर्यंत कर्णधारपदाची छाप सोडता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून संघाचा पराभव झाला होता. तर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संघाने २१० धावा करूनही सामना गमावला. आता चेन्नईसाठी अजून चिंतादायक बातमी समोर आली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन आजारी पडल्यानंतर आता वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेलाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे. जॉर्डनला २६ मार्च रोजी घशाच्या संसर्गामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच कारणामुळे तो संघाचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्यांना बरे होण्यासाठी एक-दोन दिवस लागतील. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळलेला मिल्ने दुखापतग्रस्त झाला आहे. याच कारणामुळे तो लखनऊविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळला नाही. आधीच संघाला जखमी दीपक चहरची उणीव भासत आहे.
तीन महत्त्वाचे वेगवान गोलंदाज अनफिट झाल्यामुळे, चेन्नई सुपर किंग्जकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. याच कारणामुळे लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी या दोन अननुभवी वेगवान गोलंदाजांना संधी द्यावी लागली. तुषार आणि मुकेश यांनी ७.३ षटकात एकूण ७९ धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 MI vs RR : दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता; वाचा संभाव्य Playing XI!
- IPL 2022: पंजाबच्या भानुका राजपक्षेने सांगितले निवृत्ती घेण्याचे कारण ; श्रीलंका बोर्डसंबंधी मोठे वक्तव्य
- “…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
- IPL 2022: ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोलकात्याच्या खेळाडूंचा बोलबाला, आरसीबीचे हसरंगा आणि फाफ राहिले मागे!
- “आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो सुरु करा”- देवेंद्र फडणवीस
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
