Share

“8 वर्षात असे काहीच केली नाही ज्यामुळे…” ; नरेंद्र मोदींचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

राजकोट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील राजकोट येथे एका सभेला संबोधित केले. गुजरातच्या जनतेने मला खूप काही शिकवले असल्याचे मोदी म्हणाले. यावेळी पीएम मोदींनी गेल्या 8 वर्षात केलेल्या कामांचाही उल्लेख केला. कोरोनामध्ये लोकांना सुविधा देण्याचे काम आम्ही केले. लसीसाठी कोणालाही एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. या 8 वर्षांत आम्ही एकाही भारतीयाची मान झुकू दिली नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत चुकूनही असे काही होऊ दिले नाही, ज्यामुळे तुम्हाला किंवा देशातील कोणत्याही नागरिकाला मान झुकवावी लागेल. गेली अनेक वर्षे आम्ही गरीबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राला अनुसरून आपण देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, या परिस्थितीतही आम्ही आमच्या गरीब वर्ग आणि मध्यमवर्गाला अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले. नागरिकांना सुविधा देण्यासाठी आमचे सरकार अभियान राबवत आहे.

आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “थेट आम्ही जनतेच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा केले. शेतकरी आणि कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. गरिबांचे स्वयंपाकघर चालू राहावे म्हणून मोफत गॅस सिलिंडरची व्यवस्थाही केली. गरिबांसाठी सरकार असेल तर ते त्यांची सेवा कशी करते, त्यांना सक्षम बनवण्याचे काम करते, हे आज संपूर्ण देश पाहत आहे. 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या संकटातही देशाने हे सातत्याने अनुभवले आहे. जेव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा गरीबांसमोर खाण्यापिण्याची समस्या होती, म्हणून आम्ही देशातील धान्य कोठार उघडले.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!