Share

मराठवाड्यातील सोयाबीन मातीमोल; लातूर,औरंगाबादमध्ये सर्वाधिक नुकसान

Published On: 

औरंगाबाद : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह ऊस आणि अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

यादरम्यान मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्रातील सोयाबिन मातीमोल झाल्याचे समजत आहे. आधीच सोयाबीनचे दर कमी झाले आहेत आणि त्यात हाताशी आलेल्या पिकाचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही पिक तर काढणीला आलेली असताना पाण्याखाली गेली आहेत. लातूर जिल्ह्यात 65 टक्के तर औरंगाबादमध्ये ६० टक्के भागात सोयाबीनचे पिक घेतले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी 28 हजार 422 हेक्टर सोयाबीनची लागवड झाली होती मात्र वादळ आणि सोयाबीनचे कमी झालेले भाव यामुळे तेथील २० हजारांपेक्षा जास्त शेतकरी अडचणीत सापडलेले दिसत आहेत.

यापूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला देखील अशीच अतिवृष्टी झाली होती. तेव्हा झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. तेव्हा झालेल्या पिकांच्या नुकसानीचे २० टक्के पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी पूर्ण करणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!