Share

वैजापूर तालुक्यात पेरण्या पूर्ण, बळीराजा वरुणराजाच्या प्रतिक्षेत!

Published On: 

औरंगाबाद : पावसाने दडी मारल्याने वैजापूर तालुक्यातील ७२ टक्के क्षेत्रावरील खरीप पेरण्या संकटात सापडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दहा ते बारा दिवसांच्या ‘ड्राय स्पेल’ मुळे तुषार व ठिबक सिंचन करुन शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान जुन महिन्यात वैजापूरसह खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी, गारज, लासुरगाव, महालगाव, नागमठाण व लाडगाव या दहा मंडळात सरासरी १३१ मिमी पावसाची नोंद झाली असुन महिन्याची सरासरी ओलांडुन जवळपास १२८ टक्के पाऊस झाला आहे. कमी पाऊस होऊनही या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी पुढे पाऊस पडेल या आशेवर पेरण्या उरकल्या. कृषि विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यात एक लाख ५३ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र असुन यातील एक लाख ३५ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. जून महिन्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९७ हजार ६१६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या केल्या असुन आणखी दहा टक्के पेरण्या होतील असा कृषि विभागाचा अंदाज आहे.

तालुक्यात मका व कपाशी ही दोन प्रमुख रोख रकमी पीके असुन याशिवाय सोयाबीन, बाजरी, भुईमुग, मुग, उडीद, तुर, भाजीपाला व इतर कडधान्ये, तृणधान्ये व गळित धान्ये घेतली जातात. परंतु जुन महिन्यातील मृगाच्या पावसावर शेतकऱ्यांचे पेरणीचे गणित अवलंबुन असते. त्यावरच खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पीकांचे व आंतरपीकांचे नियोजन केले जाते. जुन महिन्यात पेरणीनंतर चांगला पाऊस झाल्यास पीकांची जोमाने वाढ होऊन सरासरी उत्पन्न चांगले निघेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. पण पावसाने दडी मारल्यास पीकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!