मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर ईडीने खडसेंना समन्स बजावत आज चौकशीसाठी बोलावलं. आज ते ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने ईडी, सीबीआयला कामाला लावलं आहे, अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. यासोबतच, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई ही राजकीय हेतूनेच असल्याचा आरोप देखील केला जात आहे. खडसेंच्या चौकशीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला लक्ष्य केलं आहे.
खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले. ‘खडसेंवर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप जयंत पाटील यांनी भाजपसह ईडीवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
- मंत्री मंडळाच्या विस्तारानंतरही NDA मधील शीतयुद्ध थांबेना
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- ‘कोणी सांगितले मुंडे भगिनी नाराज आहेत? त्यांची उगीच बदनामी करू नका’, फडणवीस संतापले
- राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश म्हणजे युती होणार नाही यावर शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

