औरंगाबाद : लहान बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण वाढते आहे. यामुळे बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता औरंगाबाद महापालिकेला निमो पोकल लस उपलब्ध करून दिली आहे. खाजगी रुग्णालयात या लसीसाठी पाच हजारांचा खर्च येतो. मात्र महापालिकेला या लस उपलब्ध झाल्याने गरजूंना याचा मोठा लाभ होणार आहे. वर्षातून तीन वेळा ही लस दिली जाणार आहे. लवकरच महापालिकेद्वारे दीड महिन्यांच्या बालकापासून ही लस देण्यास सुरुवात करण्यात येईल.
पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी याबाबत सांगितले की, पाच वर्षाखालील बालकांमध्ये निमोनिया होण्याचे प्रमाण सुमारे १२ टक्के इतके आहे. सहा बालकांपैकी एका बालकाचा निमोनियाने मृत्यू होत असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या निष्कर्षामधून समोर आले आहे. बालकांमधील मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी निमो पोकल लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. निमो पोकलची दोन हजार लस मिळाली असून त्याचे बालकांना लसीकरण केले जाणार आहे. एका वर्षाच्या आतील बालकांना मोफत निमो पोकल डोस दिले जाणार आहे. दीड महिना, साडेतीन महिने, नऊ महिन्याचे बालक झाल्यानंतर त्यास तीन निमो पोकलचे तीन डोस देण्यात येतील. दिड महिन्याच्या बालकांना डोस देऊन त्याची सुरूवात केली जाणार आहे.
शहरात दीड महिन्याचे साधारणपणे दोन हजार बालके आहेत. या बालकाना मोफत निमो पोकलचा डोस देण्यासाठी दोन हजार लसी मिळालेल्या आहेत. पालिकेच्या ३८ आरोग्य केंद्रात डोस देण्याची व्यवस्था केली आहे. लवकरच त्याचा शुभारंभ केला जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयात निमो पोकल डोस बालकांना देण्यासाठी पैसे मोजावे लागतात. वर्षाच्या आतील बालकांना तीन डोस द्यावे लागत असून एका डोससाठी ५ हजार रूपये मोजावे लागतात. तीन डोससाठी साधारणपणे १५ हजाराचा खर्च येतो, असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खासगीत घेण्यापेक्षा पालिका केंद्रांतच बालकांना लस देणे फायद्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला
- कोण रुपाली चाकणकर ? मी त्यांना ओळखत नाही, नवनीत राणांचा टोला
- ‘माझा होशील ना’ मालिकेत होणार आदित्यबद्दल मोठा खुलासा
- श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार विलगिकरणात
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

