🕒 1 min read
लखनौ – पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशसह पंजाब, कर्नाटक आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. हा विस्तार करताना पंतप्रधानांनी धक्कातंत्राचा वापर करत प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला, तर नव्या 15 जणांना कॅबीनेट आणि 28 जणांना राज्यमंत्री बनवले.
दरम्यान, भाजपा आणि एनडीएपासून घटक पक्ष दूर जात असल्याचे लक्षात आल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्यात येईल असे सांगितले जात होते. अपेक्षेप्रमाणे अपना दल, एलजेपी, जेडीयू या सारख्या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र तरीही एनडीएमध्ये धुसफूस सुरूच असल्याचे चित्र आहे.निषाद पार्टीने मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
निषाद पक्षाचे सर्वेसर्वा संजय निषाद यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो मग प्रविण निषादचा का नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. निषाद समुदायाचे लोक याआधीच भाजपापासून दूर जात आहेत. जर पक्षाने त्यांची चूक सुधारली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
१८ टक्के निषाद समाजाचा पुन्हा विश्वासघात झाला असून ४-५ टक्क्यावाल्यांना मंत्रिपद मिळालं असा आरोप होऊ लागला आहे. निषाद पक्षाचे सर्वेसर्वा संजय निषाद यांचे पुत्र प्रविण निषाद यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश घेतला. त्यानंतर भाजपाने प्रविण निषाद यांना संत कबीर नगर लोकसभा जागेवरून तिकीट दिलं. या निवडणुकीत प्रविण निषाद जिंकले. प्रविण निषाद भाजपाचे खासदार आहेत. जर त्यांनी पक्ष सोडला तर त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. त्याचमुळे संजय निषाद सध्या भाजपासोबत दिसत आहेत.
दरम्यान, नव्या मंत्री मंडळात अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र असं असतानाच नव्याने संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये पक्ष बदल करुन आलेल्या खासदारांचा भरणा अधिक असल्याचं चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार विलगिकरणात
- पैठण गेट येथे पाच मजली पार्किंगची भव्यदिव्य इमारत उभारणार
- महाराष्ट्रातील दोन दिग्गज मंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा ?
- वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
