Share

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की चांगले काम करा. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढे मोठे नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. पण महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो’, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

नारायण राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा काय प्रतिक्रिया त्यांनी दिली याची आठवण करावी, कोणत्या शब्दात अभिनंदन केलं ते सांगावं. संकुचित आणि कुत्सित ही दोन उपाधी घेऊन वावरत असतात’ असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी नारायण राणेंना दिलं आहे.

‘बाळासाहेब ठाकरे देखील शरद पवारांवर टीका करायचे. पण त्या टीकेला स्टेटस होतं. पण आता ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्या बद्दल कुणाला आदर आणि आनंद वाटेल’ असे अरविंद सावंत म्हणाले. ‘कॅबिनेटमध्ये काम करताना काय होतं हे कळेल आता त्यांना, त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे नक्कीच कळेल’ असे अरविंद सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!