🕒 1 min read
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील निर्माते दीपक राणे यांच्या आगामी सिनेमात एक आगळा वेगळा प्रयोग पहायला मिळणार आहे. मराठीतील उत्कृष्ट कलाकार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचा संगम ‘पॅन इंडिया’ या चित्रपटाच्या माध्यमाने दिसणार आहे. प्रेक्षकांमध्ये या आगामी सिनेमाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
या चित्रपटाच्या माध्यमाने कन्नड मालिका विश्वातील ‘जोठे जोठेयाली’ फेम अभिनेत्री मेघा शेट्टी मराठी चित्रपटात झळकणार आहे. ‘पॅन इंडिया सिनेमा’ बद्दल सांगायचे तर ‘सध्या सिनेमे ग्लोबली प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सिनेमांचा आवाका वाढत आहे. असाच एक वेगळा प्रयोग करण्यासाठी आम्ही मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कन्नड भाषेतील प्रसिद्ध कलाकारांची निवड केली व आम्ही हा सिनेमा ग्लोबली प्रदर्शित करण्याचं ठरवलं. लवकरच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न होणार आहे, तर त्याचवेळेस या सिनेमाचे शीर्षक सुद्धा जाहीर होईल.’ असे निर्माते दीपक राणे यांनी सांगीतले.
निर्माते राणे यांनी आजवर ‘मी नाही हो त्यातला’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘खारी बिस्कीट’ अशा अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली. तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दुहेरी’, ‘फ्रेशर्स’, ‘अंजली’, ‘दुनियादारी फिल्मी स्टाईल’ अशा प्रसिद्ध मालिकांच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक राणे निर्मित, या सिनेमात मराठी कलाकारांपैकी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे, अश्विनी चावरे आणि ‘केसरी’ फेम अभिनेता विराट मडके दिसणार आहेत. दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतील लोकप्रिय ठरलेल्या ‘झिलका’ या कन्नड सिनेमातील’ मुख्य अभिनेता कविश शेट्टी, अर्जुन कापेकर, सुरेश आणि कन्नड मालिका विश्वातील ‘जोठे जोठेयाली’ फेम अभिनेत्री मेघा शेट्टी या सर्वांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करणार आहेत. शिवाय या आगामी सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे कपडे आणि वस्तूवरून केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर
- ‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
