🕒 1 min read
मुंबई : भारतात आयपीएल स्पर्धेची धामधूम सुरु आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेकडे आगामी टी-२० विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणून बघीतले जात आहे. कारण या वर्षाआखेरीस होणारा टी-२० विश्वचषक भारतात होणार आहे. मात्र या स्पर्धेपुर्वी क्रिकेट रसिकासाठी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे.
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा दक्षिण अफ्रिका संघ हा स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी कर्णधार डीन एल्गार, एकदिवसीय टी-२० संघाचा कर्णधार टेंबा बावुमा आणि महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निर्क यांनी एक निवेदन जाहिर केले आहे. या निवेदनात ते म्हणाले की, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) सरकारमधील हस्तक्षेप वाढत आहे. या कारणास्तव, वर्षाच्या शेवटी होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आयसीसी दक्षिण आफ्रिकन संघाला प्रवेश देण्यास बंदी घालू शकते.
प्रशासनावरील हे संकट १८ महिन्यांपासून सुरू आहे. आता सध्याची परिस्थिती खूप पुढे गेली आहे. आता क्रीडा मंत्रालयाने अधिकृतपणे हस्तक्षेप करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘सरकारने क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, तसे केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या हस्तक्षेपामुळे तसेच आयसीसी सीएसएवर निलंबनाची कारवाई करू शकते.’ जर असे झाले तर, दक्षिण आफ्रिका संघाला भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. तसेच बंदीच्या कालावधीत कुठलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- मित्राच्या मदतीने भावानेच केला विधवा बहिणीचा खून!
- केकेआर विरुद्ध सीएसके कसा जिंकला? ; धोनीने सांगितले कारण, म्हणाला…
- यष्टिमागे ‘माही’चा महापराक्रम ; १५० बळी मिळवणारा पहिला शिलेदार
- हॉटेलची उधारी का मागितली म्हणत, तरुणाची दगडाने ठेचून हत्या!
- चेन्नई सुपर किंग्सच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पॅट कमीन्सने नोंदवला ‘हा’ विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
