मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
या सामन्यात केकेआर कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पॅट कमिन्सने आपल्या तुफानी फटकेबाजीने एका आयपीएल विक्रमाला गवसणी घातली. पॅट कमिन्सने केलेली ६६ धावांची खेळी ही आठव्या क्रमांकावरील आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम हरभजन सिंगच्या नावे होता. आत हरभजन दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर क्रिस मॉरिस हा खेळाडु येतो.
या सामन्यात दुसऱ्या डावात चेन्नईच्या २२१ धावांचा पाठलाग करताना एकवेळ केकेआरचा अर्धा संघ ३१ धावांत माघारी परतला. मात्र त्यांनतर प्रथम आंद्रे रसेलने आणि तो बाद झाल्यावर पॅट कमीन्सने चेन्नईच्या गोलंदाजाना सळो की पळो करुन सोडले. या सामन्यात पॅट कमिन्सने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३४ चेंडुत ६६ धावांची वादळी नाबाद खेळी करत चेन्नईच्या तोंडचे पाणी पळवले. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांसाठी ‘रेमेडिसिवीर’ जीवनदायी नाही; इंजेक्शनचा वापर आणीबाणीच्या स्थितीतच व्हावा
- ‘पण मला आनंद आहे…’ ; पराभवानंतर कर्णधार इयोन मॉर्गनची प्रतिक्रिया
- महेंद्रसिंह धोनीची अशीही एक ‘अंधश्रद्धा’; प्रज्ञान ओझाने केला खुलासा
- नांदेड जिल्ह्यात कोविड सेंटरमध्ये चाकूचा धाक दाखवत गोंधळ
- इयोन मॉर्गनला एका पाठोपाठ दोन झटके ; सामनाही गमावला आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
