नांदेड: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हे गरीचे प्रमाण वाढत आहे, हे वाढते प्रमाण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. हॉटेलची उधारी मागितल्याच्या रागातून तरूणाचा दगडाने ठेवून खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उमरगा शहरात बुधवारी पहाटे ही थरारक घटना घडली. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उमरगा येथील काळे प्लॉट परिसरातील रहिवाशी आकाश दत्तात्रय अबाचणे हा शहरातील मुळज रोड परिसरात हॉटेलचा व्यवसाय करीत होता. त्याच्या हॉटेलमध्ये रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे चहा पिऊन जात व पैसे देत नसत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आकाशचे हॉटेल बंद होते. आकाश हा रोहित चुंगे व आकाश धोत्रे यांना उधारीचे पैसे मागत होता. तू आम्हाला पैसे कसे मागितले, म्हणून या दोघांनी त्यास शिवीगाळ केली होती. तसेच १८ एप्रिल रोजी आकाशच्या घरी येऊन आकाश, त्याची आई व भावास शिवीगाळ करीत मारहाण केली होती.
यावेळी व्यकंट धोत्रे सुद्धा होता. यावेळी घाबरून आकाशने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मयत आकाश हा घरी जेवण करून रूमवर झोपण्यासाठी गेला होता. बुधवारी पहाटे फिर्यादी राजेंद्र यास त्याचा चुलतभाऊ कुमार अबाचणे याने मोबाईलवर तुझ्या भावाचा मुळजरोडजवळ पालिकेच्या दुकान गाळ्यासमोरील मोकळ्या जागेत दगडाने खून केल्याची माहिती दिली. हॉटेलच्या उधारी मागितल्याच्या रागातून रोहित चुंगे, आकाश धोत्रे, व्यकंट धोत्रे, प्रशांत पुरातले व विकास जाधवयांनी भावाचा खून केल्याची फिर्याद आकाशचा भाऊ राजेंद्र दत्तात्रय आबचणे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांसाठी ‘रेमेडिसिवीर’ जीवनदायी नाही; इंजेक्शनचा वापर आणीबाणीच्या स्थितीतच व्हावा
- ‘पण मला आनंद आहे…’ ; पराभवानंतर कर्णधार इयोन मॉर्गनची प्रतिक्रिया
- महेंद्रसिंह धोनीची अशीही एक ‘अंधश्रद्धा’; प्रज्ञान ओझाने केला खुलासा
- नांदेड जिल्ह्यात कोविड सेंटरमध्ये चाकूचा धाक दाखवत गोंधळ
- इयोन मॉर्गनला एका पाठोपाठ दोन झटके ; सामनाही गमावला आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
