Share

मित्राच्या मदतीने भावानेच केला विधवा बहिणीचा खून!

Published On: 

नांदेड: मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काल घडलेल्या घटनेमुळे त्यात अजून भर पडली आहे. पाडव्याच्या सणानिमित्त आईला भेटण्यासाठी माहेरी आलेल्या सख्ख्या विधवा बहिणीचा मित्राच्या मदतीने भावाने डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला. तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. शीतल लक्ष्मण चौधरी असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी भावासह त्याच्या मित्राविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागचे कारण अस्पष्ट आहे.

शितलचा दहा वर्षांपूर्वी लक्ष्मण चौधरी या तरुणाशी विवाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. चार वषांर्पूर्वी पतीचे निधन झाल्याने शितल ही मुलीला घेऊन पुणे येथे राहत होती. आठ दिवसांपूर्वी शितल चौधरी ही पाडव्याच्या सणानिमित्त आईला भेटण्यासाठी माहेरी बोरगाव येथे आली होती. मंगळवारी रात्री जेवण आटोपून मुलीला घेऊन शितल आईसोबत एका खोलीत झोपली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास शितलचा भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोघांनी अज्ञात कारणावरून झोपेतच तिच्या डोक्यात व कपाळावर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केला.

त्यानंतर ते दोघे ही घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस नाईक अशोक गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयत शितलचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!