चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विकेटकीपिंगमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे. धोनी आयपीएलमध्ये 150 बळी मिळविणारा पहिला विकेटकीपर ठरला. आयपीएलमधील 14 व्या पर्वातील 15 व्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध ही कामगिरी केली. दीपक चहरच्या चेंडूवर विरोधी कर्णधार इयन मॉर्गनचा झेल घेऊन धोनीने त्याचा 150 वा बळी घेतला.
आयपीएलच्या 208 सामन्यांमध्ये धोनीच्या नावे 151 बळी गेले आहे. ज्यामध्ये 112 कॅच आणि 39 स्टंपिंगचा समावेश आहे. या सामन्यापूर्वी धोनी 150 शिकारांच्या आकड्यांपासून दोन पाऊल दूर होता. दीपक चाहरच्या बाहेर राहुल त्रिपाठीला झेल देऊन धोनीने आपला 149 वा बळी बनविला .
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक आहे. त्याने 200 सामन्यांत 143 शिकार (112 झेल, 31 स्टंपिंग) कामगिरी केली आहे. रॉबिन उथप्पा 189 सामन्यात 90 (58 कॅचेस, 32 स्टंपिंग्स) शिकार करून तिसर्या क्रमांकावर आहे. माजी विकेटकीपर पार्थिव पटेल 139 सामन्यांत 81 शिकार ( 65 कॅच, 16 स्टंपिंग) चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
- नांदेड जिल्ह्यात कोविड सेंटरमध्ये चाकूचा धाक दाखवत गोंधळ
- इयोन मॉर्गनला एका पाठोपाठ दोन झटके ; सामनाही गमावला आणि…
- विजयानंतर दिल्लीच्या आवेश खानने रोहित शर्माची भेट; रोहितकडून घेतली ‘ही’ खास भेट
- कोरोना अलर्ट! नांदेड जिल्ह्यात १३७२ नवे बाधीत, २५ जणांचा मृत्यू
- पॅट कमिन्सने चेन्नईच्या तोंडचे पाणी पळवले ; षटकारासह पडला चौकाराचा पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
