Share

वडिलांच्या आठवणीत सौरव गांगुलीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली सध्या आयपीएल आणि टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीत व्यस्त आहे.

गांगुलीच्या अध्यक्षतेखाली याच विषयावर आज बीसीसीआयची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत आयपीएल बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सर्व धावपळीत गांगुलीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. सौरव गांगुलीचे वडिल चंडीदास गांगुली यांचे दीर्घ आजाराने 2013 साली निधन झाले आहे.

गांगुलीने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याचे वडिल टीम इंडियाच्या माजी कॅप्टनसोबत आहेत. गांगुलीने तेंव्हा कॅप्टन म्हणून एक ट्रॉफी जिंकलेली होती. गांगुलीने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही आठवणी तुमच्या सोबत राहतात.’

https://www.instagram.com/p/CPbN2zMgd5W/?utm_source=ig_web_copy_link

गांगुलीच्या करियरमध्ये त्याचे वडिलांचे मोठे योगदान होते. ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सदस्य होते. त्याचबरोबर कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि ट्रस्टी या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. गांगुली त्यांच्या भावुक झाला आहे. फोटो पोस्ट करत त्याने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!