Share

अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

रामनाथपुरम – एका तरूणाने तर प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आहे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथील आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी प्रेमविवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,हा तरूण प्रेम विवाहाचा प्रस्ताव घेऊन तरूणीच्या घरी गेला होता. तिथे मुलीकडचे लोक त्याला म्हणाले की, हा सगळा प्रकार मुलीमुळे घडतोय, मुलगीच राहणार नाही तर हे प्रकरण होणार नाही. यावर प्रियकर विजय म्हणाला की, प्रेयसीला काहीच व्हायला नको. मी स्वत:च आत्महत्या करतो. असं म्हणत २५ वर्षीय तरूणाने अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेत आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, विजय नावाच्या या तरुणाचे एका तरूणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. विजयला त्याच्या मित्रांकडून समजलं की, अपर्णाच्या घरातील लोकांना तुमच्या रिलेशनशिपबाबत समजलं आहे. यानंतर त्यांच्या घरात मोठा वाद झाला असल्याचे देखील समजले. हे समजल्यावर विजय अपर्णाच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेला होता. पण अपर्णाच्या घरातील लोक या लग्नासाठी तयार नव्हते.

विजयने अपर्णाच्या घरच्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आणि पुन्हा लग्नाच्या परवानगीसाठी येईल असे सांगितले. यादरम्यान अपर्णाच्या घरच्यांनी कराईकुडी महिला पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. गेल्या शनिवारी विजय पुन्हा लग्नाच्या मागणीसाठी अपर्णाच्या घरी आला. त्यावेळी अपर्णाच्या घरच्यांनी म्हटले की, सगळे काही या मुलीमुळेच होत आहे, हीच राहिली नाही तर सर्व प्रकरण संपेल. हे ऐकून विजय घाबरला. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर विजयने अपर्णाच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून आग लावून आत्महत्या केली. अपर्णाला काही करू नका मीच मरतो, म्हणत त्याने आत्महत्या केली.

विजयच्या शरीराला लागलेली आग बघता शेजाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आग विझवली गेली आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर विजयला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!