जालना: प्रेम प्रकरणात आई-वडिलांचा अपमान झालेला सहन नाही झाला शेवटी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालना येथील भोकरदन तालुक्यात वालसावंगी शिवारात घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ३:३० च्या सुमारास घडला आहे. सुमित किशोर पारधे (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुमेध त्याच्या आई-वडीलांन एकुलता एक असल्याने तो सर्वांचा फार लाडका होतं. मात्र काही दिवसांपासून प्रेम प्रकरणामुळे सुमेधचे खूप वाद व्हायला लागले होते. घरच्यांशी सुद्धा खूप वाद झाले होते. या प्रेमप्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शेवटी सुमेधच्या आई-वडिलांनी गयावया करून हात जोडावे लागले. आणि हीच गोष्ट सुमेधला सतत मनातून खात होती.
प्रेम प्रकरण जरा थंड होईपर्यंत वालसावंगी येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सुमेध जात होता. वाटेत गाडीचे टायर पंक्चर झाल्याने एका ठिकाणी थांबले. डोकं दुखतंय मेडिकलमधून गोळी घेऊन येतो असं सांगत सुमेध तिथून वालसावंगी शिवारात विनीकरण विभागाच्या झुडपात गेला. तिथे एका झाडाला गळफास लाऊन त्याने फेसबुक लाइव्ह सुरु केले. हा व्हिडीओ त्याने औरंगाबाद येथील मित्राला शेअर केला होता. तेव्हा त्या मित्राने तातडीने सुमेधच्या गावातील मित्रांना कळवली, मात्र तोपर्यंत सुमेधने स्वतःला गळफास लाऊन स्वतःला संपवले होते.
सुमेधने केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये तो म्हणाला, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे.माझ्या मृत्यूस कोणाला कारणीभूत ठरवू नये. माझ्या चुकीमुळे माझ्या आई-वडिलांना लोकांचे पाय धरावे लागले, त्यामुळे असे जागून तरी काय फायदा, म्हणून मी आत्महत्या करत आहे’, असे सांगत सुमेधने आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वालसावंगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून पारध पोलिसांनी मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- ‘मी तिचा साथी आहे, मालक नाही’ ; पत्नीचा फोटो ब्लर करून पोस्ट केल्यामुळे इरफान होतोय ट्रोल
- अभिनेत्री ट्विंकल खन्नाला लेकीने दिली एक गोड शिक्षा; सोशल मिडियावर फोटो केला शेअर
- रवी शास्त्री सर्वाधिक कमाई करणारे कोच ; ‘इतक्या’ कोटींचे आहेत मालक
- ‘… हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

