Share

लवकरच ताज महालचं नाव बदलून राम महाल होणार ; भाजप आमदाराचा दावा

Published On: 

दिल्ली : जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेलं, प्रेमाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या ताज महालचं लवकरच नामांतर राम महल होईल, असा दावा भाजप आमदाराने केला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आग्रा स्थित ताज महाल हे आधी भगवान शंकराचं मंदिर होतं, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्यापासून देशातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि शहरांच्या नामकरणाचा सपाटाच लावला आहे.

दोनच दिवसांपूर्वी आग्रातील ताज महाल परिसरात हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी येथील लोकांना प्रार्थना म्हणायला लावली होती. याप्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजं असताना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं खळबळजनक दावा केला आहे. लवकरत ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भाजपच्या आमदाराचं नाव सुरेंद्र सिंह असून ते उत्तर प्रदेशातील बैरिया मतदार संघातून भाजपचे निर्वाचित आमदार आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

त्यांनी यावेळी म्हटलं की, ताज महाल ही वास्तू पूर्वी शंकराचं मंदिर होतं. त्यामुळे लवकरचं ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!