Share

लवकरच… संजय लीला भन्साळी आणि दीपिका नव्या चित्रपटातून येणार एकत्र

Published On: 

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्यास तो सिनेमा हीट होणार हे मानले जाते. दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. या दोघांनी एकत्र केलेले हे  सिनेमे हीट झाले आहेत. आता पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी आणि दीपिका नव्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

गेले काही दिवस संजय लीला भन्साळी हे त्यांचे जुने प्रोजेक्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ यामध्ये व्यस्त होते. आता पुन्हा एकदा भन्साळी या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. आता संजय लीला भन्साळी त्यांच्या नव्या चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहे. भन्साळींचा दीपिकासोबत एक मेगा प्रोजेक्ट असणार आहे. यात दीपिका एका राणीची भूमिका साकरणार आहे. ‘बैजू बावरा’ अस या चित्रपटाचं नाव असणार आहे.या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच भन्साळींना दीपिकाला या भूमिकेसाठी निवडणार होते.

‘रुपमती’ ही भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिका आणि भन्साळी यांनी या चित्रपटासाठी अनेकदा चर्चा केली आहे. १९५२ चा चित्रपट ‘बैजू बावरा’चं हे नव रुप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका व्यतिरिक्त अन्य भूमिकांविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये आणखी कोणते कलालकर असणार आहेत याबबात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या नवीन सिनेमाची दीपिकाचे चाहते लक्ष देऊन असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!