🕒 1 min read
सुरत : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
या देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पीएम केअर फंडामध्ये देणगी दिली. मात्र तरी देखील देशाची परिस्थिती खराब आहे. गुजरातमध्ये विजय पारिख यांच्या आईला करोना झाला होता. मात्र बेड न मिळाल्याने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी पीएम केअर फंडासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती.
विजय पारिख यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी 2,51,000 रुपये पीएम केअरला दिल्याचे सर्टिफिकेटही शेअर केलं आहे. विजय पारिख आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना म्हणाले की, ‘अडीच लाखांची मदत केली तरी माझ्या मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मी अजून किती रुपये दान केलं पाहिजे, ज्यामुळे माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना बेड मिळेल, ज्यामुळे त्यांचा जीव जाणार नाही.’
https://twitter.com/VeejayParikh/status/1396834006897815562?s=20
दरम्यान, विजय पारीख हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आणि त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ २०१० पासून अनेक ट्विट केले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्विटचा हवाला देत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. परीख यांनी ट्विटमध्ये पीएमओ, राजनाथ सिंह, आरएसएस आणि स्मृती इराणी यांना टॅग केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया फंडातून निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार’
- ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
