मुंबई : रामदेवबाबा यांच्या पतंलजलीने कोरोनावरील औषधाचा दावा करुन वाद ओढवून घेतला होता. यावर पतंजलीसोबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घूमजाव केले होते. आता रामदेवबाबांनी अॅलोपथीच्या औषधांबाबत नवा वाद ओढवून घेतला आहे. याचवेळी पतंजलीच्या डेअर व्यवसायाचे प्रमुख सुनील बन्सल (वय 57) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचं इन्फेक्शन वाढल्यामुळे सुनील बन्सल यांची फुफ्फुसं निकामी झाली होती. त्यासोबत त्यांना ब्रेन हॅमरेजही झाला आणि यातंच त्यांचं निधन झालं. डेअरी विज्ञानात प्राविण्य प्राप्त केलेले सुनील बन्सल यांनी २०१८ साली बाबा रामदेव यांच्या पतंजलि समुहात डेअर विभागाचा कार्यभार हातळण्यास सुरुवात केली होती. बन्सल यांच्याच कार्यकाळात पतंजलिनं पाकिटबंद दूध, दही, छास आणि पनीरसोबत इतर दूग्धजन्य पदार्थ बाजारात आणण्याची घोषणा केली होती. या संपूर्ण विभागाचं काम सुनील बन्सल पाहत होते.
बन्सल डेअरी सायन्सेसमधील तज्ञ होते. त्यांनी 2018 मध्ये पतंजलीच्या डेअरी व्यवसायाची धुरा हाती घेतली होती. त्यावेळी कंपनीने गाईचे पॅकेज्ड दूध, दही, ताक आणि चीजसह इतर दुग्ध उत्पादने बाजारात आणण्याची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पीएम केअरला अडीच लाख रुपये दिले तरी पण आईचा बेड न मिळाल्याने मृत्यू’
- ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो : अस्लम शेख
- अबब…! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी दर तासाला कमावतायत ‘इतका’ बक्कळ पैसा
- ७ मे चा निर्णय हा असंवैधानिक; ‘त्या’ जीआरवरून काँग्रेसचा राज्य सरकारला घरचा आहेर
- सकारात्मक : पुण्यात सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

