Share

पोलिसांच्या वाहनाला अपघात! आरोपी चे मेडिकलकरून पोलीस ठाण्यात जात असलेल्या टू मोबाईल वाहनाला दुचाकीची धडक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयासमोर दुचाकीने तेथूनच बेगमपुरा पोलिसठाण्याच्या घाटी मधून आरोपी चे मेडिकलकरून पोलीस ठाण्यात जात असलेल्या टू मोबाईल वाहनाला धडक दिली. हा अपघात रविवारी रात्री आठच्या सुमारास घडला. यात दुचाकीवरील दोन जन जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना पोलिसांनी घाटी दवाखान्यात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सायंकाळी आठच्या सुमारास टू मोबाईल चालक, दोन कर्मचारी आणि एक होमगार्ड घाटी मधून आरोपी चे मेडिकलकरून पोलीस ठाण्यात जात असताना, वाहनाला विद्यापीठाकडून छावणीकडे जाणाऱ्या दुचाकीने ( MH २० FL ७५५५ ) विधी महाविद्यालयासमोरील वळणावर जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि, दुचाकी समोरून अक्षरशः चुरा झाली, तसेच पोलिसांच्या गाडीचा दरवाजा आत चेपला गेला.

दरम्यान, छावणी पोलीस ठाण्याचे सपोनि पांडुरंग भागिले यांनी अपघातस्थळी सहकाऱ्यांसह भेट दिली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या सोहेल जावेद शेख ,राम राजू गायकवाड यांना उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांना दवाखान्यातून सुट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!