Share

सोनू सूद आयएएसची तयारी करणार्‍यांना विद्यार्थ्यांना देणार मोफत कोचिंग सेवा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सामान्य नागरिकांमध्ये चांगला प्रसिद्ध झाला. त्याने या जीवघेण्या काळात अनेकांना मदत केली. बॉलिवूडचा हा पॉप्यूलर स्टार सगळ्यांच्याच मदतीला धावून जात असतो. आताही त्याने असंच अनोखं काम केलं आहे. आता त्याने आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्याने ‘संभवम’ या एक शिष्यवृत्ती योजना देखील लाँच केली आहे.

ही माहिती देत सोनू सूदने ट्विट करत लिहिले की, ‘आयएएसची तयारी करायची असेल तर,आम्ही तुमची जबाबदारी घेऊ. ‘संभवम’ च्या लाँचिंगची घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. सूद चॅरिटी फाउंडेशन आणि दिया दिल्ली हा यांचा संयुक्त उपक्रम आहे.’ या ट्विटसोबतच सोनू सूदने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोफत प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीय. या फोटोमध्ये ‘इच्छुक उमेदवारांसाठी मोफत आयएएस प्रशिक्षण शिष्यवृत्ती देईल, असं मी तुम्हाला वचन देतो,’ असे लिहिले आहे.

सोनू सूदच्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सुरवातीला एक अर्ज भरावा लागणार आहे. http://www.soodcharityfoundation.org/ या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३० जून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!