अहमदाबाद : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.
या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. तसेच या सामन्यासाठीच्या तिकीटविक्रीला रविवार 14 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. पण संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व नियम काही अंशी शिथिल करण्यात आले. त्यानुसार या तिसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे. स्टेडियमची एकूण क्षमता ही 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्यानुसार 50 टक्के अर्थात 55 हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी मिळणार आहे. चाहत्यांना कोरोना नियमांच पालन कराव लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर; आजपासून नामनिर्देशन स्विकारणार, २१ मार्चला मतदान
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- वीजपुरवठा खंडितचा निर्णय मागे घ्या, आमादार संतोष दानवेंचा आंदोलनाचा इशारा
- नाकावर बेशुध्दीचे पावडर टाकून महिलेचे दागिने लुटले; अंबड नगरपरिषदेसमोरील प्रकार
- परभणीच्या वाघी परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

