🕒 1 min read
पुणे : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव भाजपने घेतले आहे. दरम्यान, एवढे गंभीर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतरदेखील काही मंडळी राठोड यांचा बचाव देखील करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, नुकतेच धनंजय मुंडे यांच्यावर देखील एका महिलेने गंभीर आरोप केले होते.हे प्रकरण राज्यभर चर्चेत असताना अचानक आरोप करणाऱ्या महिलेवर काहींनी गंभीर आरोप लावले. यानंतर पुढे अचानक त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली.
दुसऱ्या बाजूला पूजा चव्हाण या प्रकरणाशी संबंधित काही कथित कॉल रेकॉर्डिंग्ज व्हायरल झाल्या असून यामधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.या प्रकरणी कुटुंबीय काहीही भूमिका घेत नसल्याने त्यांच्यावर दबाव आहे का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल म्हणून सरकारच्या वतीने दबाव टाकून ही प्रकरणे दडपली जात नाहीत ना हा सवाल देखील उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
गुन्हाच दाखल होऊ द्यायचा नाही आणि प्रकरण दडपून टाकायचे असा पायंडा पडताना सध्या दिसत आहे.एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले म्हणजे तो व्यक्ती दोषी ठरत नाही मात्र तो दोषी आहे कि नाही हे पूर्णपणे निष्पक्ष तपास झाल्यावरच समोर येवू शकते.पुढे हा आरोप झालेला व्यक्ती निर्दोष आहे कि नाही हे ठरवणे न्यायालयाचे काम आहे मात्र काही महाभाग आरोप होताच त्या व्यक्तीला क्लीनचीट देवून मोकळे होतात. काही मंडळी समर्थनार्थ किंवा विरोधात मोर्चे काढायला देखील मागेपुढे पाहत नाहीत.
दरम्यान,राजकीय नेत्यांच्या विरोधात आवाज बुलंद करून कोणताही न्याय मिळणार नाही हा मेसेज गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींवरून महाराष्ट्रात गेल्याचे दिसून येत आहे. दिशा सालीयान केस आणि मुंडे प्रकरणानंतर आता सुरु असलेल्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य मुली यापुढे पुढाऱ्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची हिम्मत दाखवतील का हा या निमित्ताने सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- आयपीएल लिलावापुर्वी सचिनच्या लेकाची उत्कृष्ठ कामगिरी
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- “त्याची तुलना इतरांशी करण्याऐवजी त्याच्या सामर्थ्यानुसार खेळण्याची त्याला संधी देण्यात यावी”
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
