Share

मोठी बातमी: गृहिणींच बजेट कोलमडणार; घरगुती एलपीजी सिलेंडरची दरवाढ

Published On: 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. त्यात आता आज पुन्हा घरगुती सिलेंडरची दरवाढ झाली आहे.

यावेळी घरगुती सिलेंडरच्या थोडीथोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडरसाठी आता जवळपास 769 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 14.2 किलो LPG सिलेंडर गॅसची किंमत 719 रुपये इतकी होती. घरगुती सिलेंडरच्या या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने कमर्शियल ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत दोन वेळा 100 रुपयाने वाढ केली होती. कंपनीनं यापूर्वी 2 डिसेंबरला 50 रुपये आणि 15 डिसेंबरला 50 रुपयांनी प्रति सिलिंडरने वाढ केली होती.

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!