🕒 1 min read
बारामती: ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शो मध्ये अनेक दिग्गज कलाकार पाहुणे म्हणून येत असतात. नुकताच लता करे यांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती. लता करे आजीनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी त्यांचा संघर्ष ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी १ लाख २१ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. यामुळे अनेकांनी सोनुचे कौतुक केले आहे.
यावेळी उपस्थित सर्वच भारावून गेले होते. लता करे यांनी केलेल्या विनंतीवर गायक पवनदीप राजन याने “जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जित है” हे गाणे गात आनंदी केले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CQsE0xKFoPL/?utm_medium=copy_link
पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर ‘लता भगवान करे, एक संघर्षकथा’ हा चित्रपट काढण्यात आला आहे.
लता करे यांनी २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. तीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर त्यांचे मोठे कौतुक झाले. मात्र नुकतेच बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे निधन झाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
