🕒 1 min read
मुंबई – ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार होती. त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजावण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
माझे वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा असं विनंती पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला वकिलामार्फत पाठवलं आहे. वकिलामार्फत ईडीकडून इसीआर कॉपी देण्यात यावी, तसेच कुठल्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे याची यादी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रजित सिंग यांनी दिली.
दरम्यान, ८० वर्षांचे खा. शरद पवार यांना ते तरुण आहेत असे मानले जाते मग देशमुख यांना वृद्ध कसे म्हणता येईल असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काल परवा पर्यंत मी चौकशीला घाबरत नाही सर्व प्रकारचे सहकार्य करायला मी तयार असल्याचे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट का शोधत आहेत याबद्दल देखील सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.
जयश्री पाटील यांनी काल दिलेली प्रतिक्रिया
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही अटक होईल”, अशी प्रतिक्रिया देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात पडू नका म्हणून धमकी देखील देण्यात आली, असा दावा त्यांनी केलाय. पण तरीही आपण घाबरणार नसून लढा सुरु ठेवणार, असंही जयश्री पाटील यांनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
