Share

‘देशात मोदी आणि योगी सरकार हे सर्वात’…; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार चालू आहे. पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात विधानसभा निवडणूका आहेत. काही राज्यात निवडणुका झाल्या आहेत, तर काही राज्यात अजून निवडणूका पूर्ण व्हायच्या आहेत. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपले असून, उत्तरप्रदेशमध्ये अजून काही टप्याचे मतदान बाकी आहे. उत्तरप्रदेश निवडणुकांचा प्रचार करतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना आज सोनिया गांधी म्हणाल्या कि, ” भारत देशात मोदी आणि योगी सरकार ही सर्वात निरुपयोगी आणि बेजाबदार सरकार आहेत. उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधला. त्या राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. ”आज देशात अनेक महत्वाचे प्रश्न उभे ठाकले आहेत, मात्र मोदी आणि योगी यांचं त्या जटिल प्रश्नांकडे आजिबात लक्ष द्यायला वेळ नाहीये असेही आज सोनिया गांधी म्हणाल्या. ”भारत देशातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. देशातील युवा रोजगार मागत वण- वण करत आहे. देशातील सरकारी नोकरीतील तब्बल १२ लाख पद रिक्त आहेत; मात्र सरकार भरती प्रक्रिया सुरूच करत नाहीये.

नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी गेले ५ वर्ष समाजात फक्त फूट पाडण्याचेच काम केले आहे. म्हणून मोदी आणि योगी सरकार देशातील सर्वात बेजबाबदार सरकार ठरतात असे सोनिया गांधी यांनी ठणकावून सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!