मुंबई : अर्णबवरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन करून निषेध केला आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र पोलिसांची पाठ थोपटत मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठीच्या या कारवाईचे समर्थन केले आहे.
अर्णबच्या अटकेनंतर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीका-टिपण्णीचं युद्ध सुरु झालं असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी न्यायालयाचा दाखल देऊन ही कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीनेच केला असल्याचा आरोप केला आहे.
“संपादक अर्णब गोस्वामी यांच्या बाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्दे – 1) 2018 सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे “अ” समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला. 2)पोलीस कोठडीचे समर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही. 3) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला..” असं ट्विट करत शेलारांनी न्यायालयातील मुद्द्यांमार्फत गंभीर खुलासा केला आहे.
संपादक अर्नब गोसामी यांच्या बाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्दे
1) 2018 सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला.
1/3 pic.twitter.com/j9seY5LaXp— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
संपादक अर्नब गोसामी यांच्या बाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्दे
1) 2018 सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला.
1/3 pic.twitter.com/j9seY5LaXp— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
तर, “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला.. आता बोला…आता मा. न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!!” असा घणाघात भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी केला आहे.
आता मा. न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का?
आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..?
खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार!
उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा!
रोज उघडे पडा!!
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 5, 2020
महत्वाच्या बातम्या
- राजू शेट्टीनी भरला हुंकार ; यापुढे कृषी आंदोलनं दिल्लीत होतील
- फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी करा – राजेश टोपे
- पवार पॉवर : राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच ! तब्बल ५ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- अर्नब गोस्वामींवर हात उचलणाऱ्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा – राम कदम
- वेळ-काळ ठरवा, नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो; भाजपने स्वीकारलं शिवसेनेचं चॅलेंज !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

