कोल्हापूर : यापुढे कृषी आंदोलनं दिल्लीत होतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.केंद्राच्या कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधाला प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानीने आंदोलन केले. केंद्रीय कृषी विधेयकांच्या विरोधात यापुढील आंदोलने दिल्लीत होतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. ‘कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावे,’ असे आव्हान राजू शेट्टी यांनी विरोधकांनी दिले आहे.
कोल्हापूर- सांगली जिल्ह्याच्या हददीवरील अंकली पुलावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना गमिनी काव्याने आंदोलन करत असल्यामुळे जयसिंगपूर पोलीस सर्वच ठिकाणी सतर्क आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे अंकली उदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १९ वी ऊस परिषद कोल्हापुरात पार पडली होती.त्यात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक

