मुंबई :अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन केले. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
पत्रकार #अर्नबगोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए आज सुबह महामहिम राज्यपाल से भेंट की .
पोलीस के प्रती भरती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #EmergencyInMaharashtra pic.twitter.com/zjAXOeAsuR— Ram Kadam (@ramkadam) November 5, 2020
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कथित मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.
दरम्यान,अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे. दोन वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. या कुटुंबावर प्रचंड दबाव आणला गेला. त्यांना धमकवण्यात आले. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असेल तर ही कारवाई योग्यच आहे, ही अन्वय नाईक यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठीच आहे. नाईक कुटुंबाला कोणाच्या दबावाखाली धमकावून प्रकरण दाबले गेले त्या पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई केली पाहिजे अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक शब्द उच्चारल्याने महाराष्ट्र विधीमंडळाने अर्णब गोस्वामी यांना पाठवलेल्या हक्कभंग प्रस्तावावर गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. आधीच अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- बिहार निवडणुकांनंतर अमित शहांचे ‘मिशन पश्चिम बंगाल’; दलित, मटुआ कुटुंबासोबत घेणार भोजन…
- भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेस कडून भव्य ट्रक्टर रॅली काढत निदर्शने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

